मराठी अनुदिनी वाचताना सदस्यान्च्या कविता बघून एक कल्पना सुचली. आपल्याकडे इतके कवी आहेत, तर अस काही करता येइल का की कोणीतरी पहिल्या ओळी सुचवायच्या आणि कोणीतरी त्या पूर्ण करायच्या. जस की या पहिल्या ओळी आहेत
दूर क्षितीजावरती सूर्य आता मावळला
डांबरी रस्ता आणि नागमोडी वळण
या रूक्ष ओळीना त्याना शोभतील अशा पण कोमल ओळी कोणी सुचवू शकेल काय?
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
दूर क्षितीजावरती सूर्य आता मावळला
काय दिवस हे आले, हंस आता कावळला*
*कावळला = कावळा झाला ;)
शशांक
डांबरी रस्ता आणि नागमोडी वळण
ओळखीचीच वाट, संपते कुठे पण?
दूर क्षितिजावरती सूर्य आता मावळला,
चाकोरीत शिणलेला दिवसही ढळला,
निरर्थक आयुष्याचे तेच ते दळण
डांबरी रस्ता आणि नागमोडी वळण
-- (शिकाऊ कवी) नंदन
निरर्थक आयुष्याचे तेच ते दळण
डांबरी रस्ता आणि नागमोडी वळण
he vishesh avaDale..
Post a Comment