Tuesday, December 18, 2007
नव जुन
काल Travel Channel वर Hamburger Paradise नावाचा कार्यक्रम पाहिला. त्यात अनेक वर्ष त्याच जुन्या पद्धती वापरुन त्याच जुन्या ठिकाणी चालू असलेली restaurant दाखवत होते. त्याचे मालक देखील अतिशय अभिमानानी आपण कसे गेली १००, ५० वर्ष त्याच प्रकारे बर्गर करत आहोत ते सांगत होते. बऱ्याच ठिकाणी आतली रचना, खुर्च्या, टेबल काहीच बदलल नव्हत. तिथे येणारे लोकही आम्ही त्याच जुन्या चवीसाठी, जुन्या आठवणीसाठी इथे येतो अस सांगत होते. ते बघून मला एकदम आपल्याकडच्या बेडेकर मिसळ प्रकारच्या हॉटेलची आठवण झाली. बाकी सगळ जग झपाट्यान बदलताना काही गोष्टी तरी न बदलता राहिल्या आहेत. हे ही नसे थोडके.
Friday, July 28, 2006
गजरा
काही महिन्यापूर्वी पुण्याला गेले असताना सकाळी सकाळी सारसबागेत गेले होते. (पहाटे उठून पर्वतीला जायच्या plan च रुपान्तर सारसबागेत जाण्यात झाल असो.) तर गणपतीच दर्शन घेउन बाहेर आलो तर बाहेर हे एवढे गजरे पदपथाच्या बार वर ओळीनी लावले होते!!! वा!
लहानपणी केस छोटे असताना मोठा गजरा हवा असायचा. आणि तो डोक्यावर असा गोल बान्धायचा. तेव्हा मोगरा आणि कुन्दाच्या झाडाला फ़ूल आली की स्पर्धा असल्यासारखी जास्तीतजास्त फ़ूल जमवायची. त्यासाठी फ़ान्द्या ओढायच्या, जागा मिळेल तिथून त्याच फ़ान्द्यातून आत जायचा प्रयत्न करायचा, मग खरचटायच पण जास्त फ़ूल जमवायची. मग त्याचा घट्ट (दाट, कमीतकमी दोर्यात जास्तीतजास्त फ़ूल घालायची) गजरा करायचा आणि मग तो घालायचा. मला काय तो गजरा शाळेतल्या बाईना देण्यात फ़ारसा नसायचा. तर नन्तर college मधे गेल्यावर अचानक गजरा आवडेनासा झाला. आजी उपरोधिकपणे म्हणायची आता काय तुम्हाला गजरा आवडत नाही ना तर मी काय करत नाही.
आत्ता जवळ जवळ २ वर्षानी पुण्याला गेले होते तेव्हा आजी रोज गजरा करून द्यायची आणि मी हो घालीन की अस म्हणून घालायचे.

Saturday, June 03, 2006
पर्वती
Wednesday, March 15, 2006
Camera
हल्ली सगळीकडे प्रत्येक लहान, मोठ्या दुकानात, इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी, elevator मधे camera असतो. मी ज्या गावात राहाते तिथे प्रत्येक आणि प्रत्येक चौकात सिग्नलला camera हजर. (हे म्हणजे सिनेमातले नट आणि नट्या जेवढ्या camera समोर असतात त्यापेक्षा आपण जास्त वेळ camera समोर असतो). अस म्हणतात ना की देव सगळीकडे असू शकत नाही म्हणून त्याने बनवली आई (चूक भूल देणे घेणे) , तस पोलिस सगळीकडे असू शकत नाहीत म्हणून त्यानी camere बनवले.
तसच पूर्वी म्हणत चोराच्या मनात चान्दण तस आता चोराच्या मनात camera.
तसच पूर्वी म्हणत चोराच्या मनात चान्दण तस आता चोराच्या मनात camera.
Friday, February 03, 2006
कविता
मराठी अनुदिनी वाचताना सदस्यान्च्या कविता बघून एक कल्पना सुचली. आपल्याकडे इतके कवी आहेत, तर अस काही करता येइल का की कोणीतरी पहिल्या ओळी सुचवायच्या आणि कोणीतरी त्या पूर्ण करायच्या. जस की या पहिल्या ओळी आहेत
दूर क्षितीजावरती सूर्य आता मावळला
डांबरी रस्ता आणि नागमोडी वळण
या रूक्ष ओळीना त्याना शोभतील अशा पण कोमल ओळी कोणी सुचवू शकेल काय?
दूर क्षितीजावरती सूर्य आता मावळला
डांबरी रस्ता आणि नागमोडी वळण
या रूक्ष ओळीना त्याना शोभतील अशा पण कोमल ओळी कोणी सुचवू शकेल काय?
Saturday, January 28, 2006
पुण्यातल्या... नाही अमेरिकेतल्या पाट्या
पुणेकर त्यान्च्या तर्हेवाइकपणाबद्दल आणि पुणे तिथल्या पाट्यान्बद्दल प्रसिद्ध आहे. ह... एकादा कानफाट्या नाव पडल कि ते काय जात नाही. तर तर्हेवाइक पाट्या काय फक्त पुण्याचीच मक्तेदारी नाही. जगात आणखीनही अशा पाट्या आहेत. त्यातलीच हि एक. Washington D.C. च्या विमानतळाच्या parking lot मधली.
गवतावर गाड्या पार्क करु नका
New Jersy ला सुद्धा अशी Wait for the Green Light अशी पाटी आहे.
असाच आणखिन एक किस्सा. माझ्या मित्राच्या घरासमोर एक American आजी राहतात. त्यान्च्या दारावर पाटी आहे: Take off your shoes. I don't clean my house for nothing.
आता बोला
New York च्या Central Park मधून बाहेर पडल्यावर समोरच दिसलेली ही पाटी कारणाशिवाय/ गरजेशिवाय आवाज करण्यास बन्दी आहे...?
one more
May be some of the letters were also thrown from the observation deck!
Subscribe to:
Posts (Atom)