Tuesday, December 18, 2007
नव जुन
काल Travel Channel वर Hamburger Paradise नावाचा कार्यक्रम पाहिला. त्यात अनेक वर्ष त्याच जुन्या पद्धती वापरुन त्याच जुन्या ठिकाणी चालू असलेली restaurant दाखवत होते. त्याचे मालक देखील अतिशय अभिमानानी आपण कसे गेली १००, ५० वर्ष त्याच प्रकारे बर्गर करत आहोत ते सांगत होते. बऱ्याच ठिकाणी आतली रचना, खुर्च्या, टेबल काहीच बदलल नव्हत. तिथे येणारे लोकही आम्ही त्याच जुन्या चवीसाठी, जुन्या आठवणीसाठी इथे येतो अस सांगत होते. ते बघून मला एकदम आपल्याकडच्या बेडेकर मिसळ प्रकारच्या हॉटेलची आठवण झाली. बाकी सगळ जग झपाट्यान बदलताना काही गोष्टी तरी न बदलता राहिल्या आहेत. हे ही नसे थोडके.
Subscribe to:
Posts (Atom)