
लहानपणी केस छोटे असताना मोठा गजरा हवा असायचा. आणि तो डोक्यावर असा गोल बान्धायचा. तेव्हा मोगरा आणि कुन्दाच्या झाडाला फ़ूल आली की स्पर्धा असल्यासारखी जास्तीतजास्त फ़ूल जमवायची. त्यासाठी फ़ान्द्या ओढायच्या, जागा मिळेल तिथून त्याच फ़ान्द्यातून आत जायचा प्रयत्न करायचा, मग खरचटायच पण जास्त फ़ूल जमवायची. मग त्याचा घट्ट (दाट, कमीतकमी दोर्यात जास्तीतजास्त फ़ूल घालायची) गजरा करायचा आणि मग तो घालायचा. मला काय तो गजरा शाळेतल्या बाईना देण्यात फ़ारसा नसायचा. तर नन्तर college मधे गेल्यावर अचानक गजरा आवडेनासा झाला. आजी उपरोधिकपणे म्हणायची आता काय तुम्हाला गजरा आवडत नाही ना तर मी काय करत नाही.
आत्ता जवळ जवळ २ वर्षानी पुण्याला गेले होते तेव्हा आजी रोज गजरा करून द्यायची आणि मी हो घालीन की अस म्हणून घालायचे.